.भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रुग्णालयातील एम.आय.आर.मशिन अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने गरिब गरजू रुग्णांची गैरसोय होताना दिसते.
विरारपासून ते मालाड गोरेगाव पर्यंतच्या गरिब रुग्णांना कांदिवली पश्चिम येथील भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालयात अत्यंत अल्प दरात सर्व सुख सोयी युक्त उपचार मिळत असतात.
अवघ्या २५०० रुपयांत येथे रुग्णांना एम.आय.आर.काढून दिला जातो.ही रुग्णांच्या बाबतीत खूप चांगली गोष्ट आहे,पण गेल्या अनेक दिवसांपासून एम.आय.आर.मशिन नादुरुस्त असल्याने गरिब गरजू रुग्णांची गैरसोय होत आहे.
खाजगी एम.आय.आर.सेंटर वर मन मानेल तसे पैसे रुग्णांकडून घेऊन एम.आय.आर.काढला जातो,गरिब गरजू रुग्णांना खाजगी सेंटर वर एम.आय.आर.काढणे आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने शक्य होत नाही.
मनपा आंबेडकर रुग्णालयातील एम.आय.आर.मशिन प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्त करून गरजू गरीब रुग्णांच्या सोयीसाठी उपलब्ध करून द्यावे.जेणे करुन रुग्णांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार नाही.
Discussion about this post