भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.बुधवार दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी नवी दिल्ली या ठिकाणी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सहकुटुंब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली.या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी राम शिंदे यांचे सभापती पदावर निवड झाल्याने
अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या व मोलाचे मार्गदर्शन केले राम शिंदे यांच्या कुटुंबीयाची चौकशी केली,तर सभापती पदावर निवड केल्याबद्दल राम शिंदे नी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती देऊन राम शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सन्मान केला.
आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३००वी जयंती ( त्रीशताब्दी) जयंती चौंडी येथे मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे
या जयंती सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती करुन निमंत्रण दिले.राम शिंदे यांच्या निमंत्रणाचा स्विकार केला.या भेटीबद्दल सभापती राम शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले.

Discussion about this post