चिमूर क्रांती शहीद स्मृती दिन सोहळा २०२४ व माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या स्मृती दिन सोहळा बी. पी. एड. कॉलेज मैदान, चिमूर या ठिकाणी कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस,राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री मान.हंसराज जी भैया अहिर,माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री श्री.अशोकजी नेते यांच्यासह आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया,
माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर,माजी वि.प.आमदार मितेशजी भांगडिया,प्रकाशजी देवतळे, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी गमे,प्रकाशजी वाघ यांच्यासह स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व त्यांचे कुटुंबीय आदी उपस्थित राहून चिमुर या क्रांती भूमीत वीर शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी मा.खा.अशोकजी नेते यांनी १६ ऑगस्ट ला चिमूर शहीद स्मृती दिनानिमित्त चिमूर येथे उपस्थितीत राहुन हुतात्मा स्मारक तसेच शहिदांना अभिवादन केले.चिमूर येथील शहीद स्मृती दिन सोहळा कार्यक्रम प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस साहेब यांचा भाजप महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दोन महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले. त्यामुळे भाजप महिला आघाडी कडून सत्कार करीत अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, आमदार बंटीभाऊ भांगडिया,माजी आमदार अतुलभाऊ देशकर व आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. मायाताई नन्नावरे,महिला आघाडी प्रदेश चिटणीस सौ. ममता डुकरे,सौ. दुर्गा सातपुते,सौ.आशा मेश्राम, सौ.ज्योती ठाकरे सौ. वैशाली चन्ने,आदी महिला उपस्थिती होत्या.




Discussion about this post