चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या
शुभम मंडपे यांची मागणी
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सतत येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांची धानाची पिके सोयाबीनची पिके कापसाची पिके, तुरीची पिके ही सगळी पावसामुळे नासधूस झालेली आहे नदी नाल्यालगतची शेतकऱ्यांची पिके पूर्णतः वाहून गेलेली आहेत आणि सतत देणाऱ्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे,त्यामुळे तात्काळ चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना वंचित बहुजन युवाआघाडीचे जिल्हध्यक्ष शुभम मंडपे यांनी केली आहे
ग्रामीण भागातही पावसामुळे शेतकरी शेमजुराचे घरांची पडझड झाली आहे, ग्रामीण भागातील रस्ते,पुल वाहून गेले आहेत.. त्यामुळे शेतकरी शेतमजूर, विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.. म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून पंधराही तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करून पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी
याची मागणी वंचित बहुजन युवाआघाडीच्या वतीने करण्यात आली यावेळी निवेदन देतांना वंचित बहुजन युवाआघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविताताई गौरकर,आंबोली गावचे माजी सरपंच मुतलीधरजी चुनारकर,महानगर कार्याध्यक्ष सतीश खोब्रागडे, युवा उपाध्यक्ष संदीप देव, सचिव छोटू दहेकर, जिल्हा सदस्य अश्विन शेंडे,तेजराज भगत आदी उपस्तितीत होते
Discussion about this post