============================= *सांगली :-* सध्या सांगली जिल्ह्यामध्ये घरगुती स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याचे काम छुप्या पद्धतीने महावितरण कंपनी सुरू केले आहे, महाराष्ट्र सरकारने मीटर बसवण्याचे काम आदानी एनर्जी सोल्युशन कंपनीला दिले आहे… महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी मीटर बसविण्याचे काम सुरू झाले आहे
तेथील लोकांनी याला प्रखर विरोध दर्शविला आहे, इतर पक्ष, सामाजिक संघटनांची मोठ-मोठी आंदोलने सुरू आहेत, तरीही सांगली जिल्ह्यामध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कंपनीचे कर्मचारी प्रिपेड मीटर बसविण्याचे काम करत आहेत
हे लक्षात आल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए-आंबेडकर) सांगली जिल्ह्याच्या वतीने ७ दिवसापूर्वी सांगली येथील महावितरणचे मुख्य कार्यालयाचे अधिकारी मा. अधीक्षक अभियंता यांना समक्ष भेटून निवेदन देऊन सांगली जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याचे काम थांबवावे
यामुळे भविष्यात गोरगरिबांना मोजकी वीज वापरावी लागणार, कंपनी मनमानी पद्धतीने वीज दरवाढ लोकांच्यावर लादणार, सध्याच्या मीटर प्रमाणे बिल आकारणी दरम्यान लोकांना थकीत वीज बिल वसुलीच्या नियम,अटी असल्यामुळे लोकांना बिल भरण्यासाठी कालावधी मिळत आहे तो कालावधी प्रीपेड मीटर मुळे सर्वसामान्य गोरगरीब लोकांना मिळणार नाही यामध्ये सर्वात जास्त फटका मागासवर्गीयाना बसणार आहे….
शिवाय विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री आणि सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी काहीही झाले तरी महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवणार नसल्याची घोषणा केली होती,
त्यामुळे त्यांनी आपला शब्द पाळावा… तसेच स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कस फेडरेशन संघटनेनेही विरोध दर्शविला आहे यामुळे महावितरण मधील कंत्राटी पद्धतीवर असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे काम बंद होणार आहे…
म्हणून सांगली जिल्ह्यात स्मार्ट प्रिपेड मीटर बसविण्यास प्रखर विरोधासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए-आंबेडकर) पक्षाच्या वतीने उद्या दि.१७/०१/२०२५ रोजी *जिल्हाधिकारी कार्यालय समोर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात “निदर्शने आंदोलन”* करणार आहोत..
———————————————-
Discussion about this post