प्रतिनिधी – कल्याण सोन्नर,
9921779668..
निजामकालीन परंपरेला दुसऱ्यांदा खंड..
केज –
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृणपणे केलेल्या हत्येचे प्रकरण मागील तीन महिन्यापासून राज्यभर गाजत आहे. या शेजारच्या गावात घडलेल्या दुःखद घटनेमुळे विडा (ता. केज) येथील ग्रामस्थांनी यंदा धुळवडीला जावयाची गाढवावरून मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निजामकालीन परंपरेला कोरोना नंतर दुसऱ्यांदा खंड पडत असून गर्दभ सवारी निघणार नसल्याने जावईबापूंना दिलासा मिळाला आहे..
Discussion about this post