गुरुवार दिनांक 16/1/2025 रोजी जनता विद्यालय खोपोली येथील रामशेठ ठाकूर हॉलमध्ये *यशस्वी व्यवसायाचा मंत्र* या विषयावर व्याख्यान पार पडले.
याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून जनता विद्यालयाचे माजी विद्यार्थी , ज्येष्ठ लघुउद्योजक व समाज कार्यकर्ते श्री रामचंद्र भाई देशमुख उपस्थित होते.
याप्रसंगी जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक व पदसिद्ध कार्यवाह श्री देशमुख प्रदीप सर, उपमुख्याध्यापक श्री खाडे सर, रायगड जिल्हा अविरत चे समन्वयक श्री जितेंद्र देशमुख सर , जनता विद्यालय तंत्र शिक्षण विभागाचे प्रमुख श्री देसाई एच .एन सर, खालापूर पंचायत
समिती समन्वयिका सौ आशा बैसाणे मॅडम तसेच डॉक्टर रामहरी धोटे शिशु मंदिर व जनता विद्यालयातील जवळजवळ अडीचशे विद्यार्थी सदर व्याख्यानमालेत उपस्थित होते.
श्री देशमुख साहेबांनी अतिशय सुंदर आणि मोजक्या शब्दात यशस्वी उद्योजक कसे व्हावे याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
Discussion about this post