शिरूर.अनंतपाळ/वाल्मीक सूर्यवंशी.
शिरूर अनंतपाळ :- येथील शिवनेरी महाविद्यालयात भूगोलशास्त्र विभागाच्यावतीने १४ जानेवारी रोजी डॉ. सी. डि.देशपांडे यांचा जन्म दिवस राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून आणि मकर संक्रात निमित्त तीळ गूळ वाटप करून साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात पृथ्वीगोलाची पूजा करून करण्यात आली .या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा भूगोल विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश जाधव यांनी मकर संक्रात आणि भौगोलिक घटना क्रम यांचा कसा संबंध आहे या संदर्भात पी.पी. टी. प्रेझेंटेशन द्वारे मत मांडत असताना अक्षवृत्त आणि रेखावृत्ताची रचना सांगितली. त्यांनी पुढे बोलताना आजपासून सूर्याचे उत्तरायण होते. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. आणि दिनमान आजपासून मोठे होण्यास सुरुवात होते. तसेच ऋतू बदलास देखील प्रारंभ होतो. असे मत व्यक्त केले. यावेळी भूगोल अभ्यास मंडळाच्या वतीने दोन भिंतीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ,या कार्यक्रमाचा आध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण धालगडे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागातील डॉ हनुमंत वागलगावे यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रा शाम कांबळे यांनी केले. मंच्यावर भूगोल अभ्यास मंडळाची अध्यक्ष सानिया मणियार उपस्थित होती. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा.गोरोबा रोडगे व सर्व प्राध्यापक, शिक्षेकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने हजर होते.

Discussion about this post