मलकापुर शहरातील ग्रिन झोनमधील बगीचा व दुकान समुहासाठी राखीव असलेल्या जमिनीवरील ४२ब चा आदेश रद्द करुन फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई राजेश इंगळे यांनी एका तक्रारी द्वारे केली आहे.
उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, मलकापूर शहरातील गट नंबर १९०/१ ही जमिन ग्रिन झोनमध्ये समाविष्ट असुन नगरपालिका विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक ४२नुसार बगीचासाठी तर आरक्षण क्रमांक ५२ नुसार दुकान समुहासाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. या जमिनीच्या मालकाने ॲडिशनल तहसीलदार खामगाव(NAA) यांचेकडून सन १९८५मधे गैरमार्गाने एन.ए.पी.३६चा आदेश प्राप्त करून त्या आधारे एक बनावट नकाशा तयार करून लेआऊट टाकून त्यापैकी दोन प्लाॅट दुय्यम निबंधकास चिरीमीरी देउन डाॅ.जैन व हेमंत भट्टड यांना विकले.व डॉ.जैन यांनी या प्लाॅटवर बेकायदेशीर इमारत बांधकाम केले.परंतु या सर्व बेकायदेशीर कृत्याचे बिंग फुटल्याने सन २०१३मधे याबाबत तहसिलदार व उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचेकडे तक्रार दाखल करण्यात आली.तहसिलदारांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून जमिनमालकाने बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहार केल्यामुळे सदर जमीनीवरील डॉ.जैन व हेमंत भट्टड यांचे नांव गावं नमुना ७वरुन कमी करण्याचें आदेश दिले.तसेच उपविभागीय अधिकारी यांनीसुद्धा डॉ.जैन व हेमंत भट्टड यांचे नमुना ७वरुन नांव कमी करण्याचे आदेश दिले.व त्यानुसार कारवाई सुद्धा करण्यात आली.
यानंतर डॉ.. जैन व भट्टड यांनी २०२० मध्ये तहसीलदार मलकापुर यांचेकडे खोटेनाटे व बनावट दस्ताऐवज दाखल करून व खोटी माहिती देऊन,शासनाची फसवणूक करून तहसिलदार यांचेकडून कलम ४२ ब ची सनद मिळवून नमुना ७ ला नोंदी करून घेतल्या.
गट नंबर १९०/१ मधील जमिन ही शहरातील लाखो लोकांच्या स्वास्थ्यासाठी व सोईसाठी राखीव असल्याने जनहितासाठी डॉ.जैन व हेमंत भट्टड यांना दिलेल्या ४२ब च्या सनदी रद्द करुन त्यांचे विरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाई राजेश इंगळे यांनी केली आहे.
Discussion about this post