प्रा.दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी)
देऊळगाव राजा परिसरातील सर्व नागरिकांना सतर्क करण्यासाठी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी नागरिकांसाठी काही मार्गदर्शक गाईड लाईन जारी केल्या असून नागरिकांनी त्यांचे पालन करावे अशा सूचनाही केल्या आहेत.सैलानी बाबा यात्रा सुरू झालेली तसेच उन्हाळी सुट्याही सुरू होत आहेत तरी आपल्या मालमत्तेची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात या सूचना महत्वाच्या आहेत.
१)दिवसा घरफोडी होण्याची शक्यता नाकारत येत नाही घराला कुलूप लावून जातानां घराला पडदा लावावा.
२)सोने पॉलिश करून देणारे कोणी फिरत असतील तर अशा माणसान घरामध्ये घेवू नये असा कोणी व्यक्ती संशयित फिरत असेल तर पोलिस स्टेशनला ताबडतोब कळवावे.
३)बँक मध्ये पैसे टाकणे किंवा काढणे असल्यास आपली बॅग, पर्स ,थैली याकडे विशेष लक्ष ठेवावे कुणाच्याही भूलथापानां बळी पडू नये.
४)रात्रीच्या वेळेस चोर महिलांचे आवाज काढून दरवाजा उघडण्यास सांगतात नंतर घरामध्ये प्रवेश करून चोरी करतात.
५)आपल्या फोर व्हिलर ,टू व्हिलर वाहनामधे डीकी मधे आपल्या मौल्यवान वस्तू ठेवू नये.
६)कोणत्याही महाराजांची वेषभूषा असलेला किंवा अनोळखी व्यक्तीनां घरामध्ये घेवू नये.
७)बस मधे चढतानां उतरतांना महिलांनी आपली पर्स जपून ठेवावी तसेच पुरुषांनी आपल्या खिशामध्ये पैसे जपून ठेवावे.
८)सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी आपले दुकान ,घर याठिकाणी CCTV कॅमेरे लावावे. याशिवाय काही संशयित व्यक्ती , हालचालींवर लक्ष ठेवून सामाजिक जबाबदारी म्हणून त्वरित पोलीस स्टेशनला संपर्क करून सूचना करावी..
Discussion about this post