मैत्रा फाउंडेशन च्या २०२४- २५ वर्षातील राज्यस्तरीय शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवडीफाटा ता. वडवणी येथील आदर्श शिक्षिका श्रीमती.पूनम अनिल वरोडे यांची निवड झालेली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मैत्रा फाउंडेशन, महाराष्ट्र याच्या कडुन साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण व सेवा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्रतिवर्षी राज्यस्तरीय शिक्षण महर्षी पुरस्कार देण्यात येतो. या वर्षीचे पुरस्कार जाहीर झाले असून. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवडीफाटा येथील प्राथमिक शाळेच्या आदर्श शिक्षिका श्रीमती.
पूनम अनिल वरोडे मॅडम यांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी सतत धडपडणे,आनंददायी अध्यापन आणि अध्यापनात विविध शैक्षणिक साहित्याचा कौशल्यपूर्ण उपयोग,विविध उपक्रमातून मनोरंजक अध्यापन अशा प्रकारच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी ची दखल घेत संस्थेने वरोडे यांना या वर्षीचा राज्यस्तरीय शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे.
यापूर्वी ही त्यांना रोटरी क्लब ऑफ बीड च्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. दि.१९ रोजी सकाळी १० वा.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,बीड.
येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. शिक्षिका वरोडे मॅडम यांच्या शिरपेच्यात राज्यस्तरीय शिक्षण महर्षी पुरस्काराचा आणखी एक मानाचा तुरा रोवल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Discussion about this post