वडवणी (प्रतिनिधी) वडवणी तालुक्यातील मोरवड येथील माध्यमिक विद्यालयात राजमाता माॅं जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.वाघ एस पी सर तर प्रमुख पाहूणे म्हणून जेष्ठ शिक्षक कोठुळे जी एस सर हे होते.
बहारदार अशा मंत्रमुग्ध करणार्या सूरात कु.कटारे कल्याणी व कु.मुजमुले देवयानी यांनी माॅं जिजाऊ वंदना गाऊन कार्यक्रमाला प्रारंभ केला.सर्व मान्यवरांच्या हस्ते राजमाता माॅं जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर स्वागतगीत कु.आश्विनी शेळके व कु.अक्षरा लंबाटे यांनी गाऊन उपस्थितांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चि.शेळके कृष्णा यांनी परखड अशा शैलीत सादर केले.त्यांनतर ज्ञानेश्वरी गायकवाड,भारती गांडगे,भाग्यश्री कटारे,शिंदे पुजा, यांनी राजमाता माॅं जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विचार मांडले.त्यानंतर श्री.पुर्णे सर,श्री.राठोड सर,श्री.कांबळे सर,श्री.करपे सर,श्री.परळकर सर यांची भाषणे झाली.प्रमुख पाहुणे श्री.कोठुळे सर यांनी राजमाता माॅं जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट उलगडला त्यांनी सुरेख असे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक श्री वाघ सर यांनी आजच्या युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर बोध घ्यावा.त्यांचे विचार आत्मसात करावे.राजमाता माॅं जिजाऊ या जगातील एक आदर्श मातृत्व आहे.
त्यांनी मार्गदर्शन आणि पाठबळ दिल्यामुळेच स्वराज्य उभे राहिले.या दोन्ही महामानवांच्या कार्यातून आपण प्रेरणा घ्यावी असे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला मार्गदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.राठोड ए आर सर यांनी केले.
बहारदार असे सूत्रसंचालन कु.शेळके श्रृती भानूदास व कु.शेळके अविष्का दत्तात्रय यांनी केले.तर आभार कु.शेंडगे भाग्यश्री सुरेश यांनी मांडले. अशा रितीने सुंदर असा जयंतीचा सोहळा पार पडला.
Discussion about this post