• “भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले, हे संपूर्ण देशाला माहीत असलेले ऐतिहासिक सत्य आहे. लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन हे स्वातंत्र्य मिळवले. त्यांच्या संघर्षाला कमी लेखणे हा त्यांच्या त्यागाचा अपमान आहे. यासाठी कोणत्याही विशिष्ट धार्मिक घटनेला ‘खरे स्वातंत्र्य’ म्हणणे, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या महान इतिहासाला नाकारण्यासारखे आहे.
•भारतातील स्वातंत्र्य हे केवळ एका धर्माचे नसून संपूर्ण भारतीय जनतेचे आहे. विविधता आणि एकता हीच भारताची ओळख आहे. त्यामुळे एखाद्या विशिष्ट धार्मिक कार्यक्रमाला ‘खरे स्वातंत्र्य’ म्हणणे, इतर समाजघटकांना दूर सारण्यासारखे आहे. अशा विधानांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण होते, जी टाळली पाहिजे.
•भारत हा संविधानाने चालणारा देश आहे आणि आपले संविधान सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांवर आधारित आहे. कोणत्याही एका धर्माच्या घटनेला संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्याशी जोडणे, हे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना धक्का लावणारे आहे. संपूर्ण भारतवासीयांना हे मान्य होईलच असे नाही.
•आपल्या देशातील काही शक्ती संविधानाच्या विरोधात जाऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वातंत्र्य हा संपूर्ण भारताच्या कष्टाचा आणि संघर्षाचा विजय आहे, तो कोणत्याही एका गटाचा मालमत्ता असू शकत नाही. त्यामुळे असे विधान देणे म्हणजे भारतीय जनतेच्या ऐक्याला दुबळे करण्याचा प्रयत्न आहे….
प्रतिनिधी:- प्रविण डी कोवाची (9637165828)
Discussion about this post