डायनॉमिक स्कूल, सुळेरान येथे स्नेहसंमेलन उत्साहात…
आजरा: प्रतिनिधी,
सुळेरान ता. आजरा येथील जयहिंद एज्यूकेशन सोसायटीच्या डायनॉमिक पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
मेजर श्रीपती मयेकर केडीसी. बँक व वसंतराव देसाई साखर कारखाना संचालक श्री. सुधीरभाऊ देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात जून्या नव्या मराठी हिंदी गाण्याच्या नृत्यांवर व भारूडे भावगीते विनोदी एकांकीका या द्वारे उपस्थितांची मने जिंकली तसेच मर्दानी मल्लखांब याचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांचा पारितोषिक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी संस्थापक संजय दाभोळे, चैतन्य दाभोळे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी कॉम्रेड संपत देसाई, विक्रम देसाई, कारखाना संचालक गोविंद पाटील, तसेच पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थ, शिक्षक वृंद उपस्थित होते.
प्रशांति चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले तर आभार संतोष पाटील मुख्याध्यापक यांनी मानले.
Discussion about this post