

प्रतिनिधी प्रशांत माने नारायणगाव : सकाळी १० च्या दरम्यान नारायणगाव च्या दिशेने जाणारी १६ प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो गाडीवर पाठीमागून आयशर ट्रक आढळून पुढे रस्त्यात उभी असलेली एसटी महामंडळाची तांत्रिक बिघाड झालेल्या नाशिक – महाबळेश्वर एसटीला प्रवासी मॅक्झिमो वाहन आदळल्याने मुक्ताई ढाब्याजवळ भयंकर अपघात झाला. या घटनेची माहिती कळताच तात्काळ अपघातस्थळी भेट दिली. या अपघातात खेड व जुन्नर तालुक्यातील रहिवाशी असलेले ०९ जण मृत्युमुखी तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मॅक्सकेअर हॉस्पिटल येथे अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना धीर देत संबंधित डॉक्टरांशी इतर रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेतली. काही रुग्णांची प्रकृती नाजूक आहे .वाहतूक करणाऱ्या व्हॅनला भरधाव आयशर टेम्पोने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की वॉन रस्त्याच्या कडेला उभ्या एसटीवर पाठीमागून जाऊन धडकली व पुना त्यावर टेम्पोही धडकली. या दोनही वाहनांमध्ये वॉन अक्षरशः चक्काचूर होऊन त्यातील ९ जणांचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी झाले. शुक्रवारी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ हा भीषण अपघात झाला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.देबुबाई टाकळकर (६५, रा. वैशाखखेडे), विनोद रोकडे (५०, रा. कांदळी), युवराज वावाळ (२३, रा. कांदळी), चंद्रकांत गुंजाल (५७, रा. कांदळी), गीता बाबुराव गवारे (४५, कांदळी), भाऊ बड़े (६५, कांदळी), नजमा आहमद हनीफ शेख (३५), वसिफा इनामदार (५), मनीषा पाचरणे (६, रा. जुन्नर, जि. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. मृतांत एका शिक्षिकेसह स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा समावेश आहे. ऋतुजा पवार (२१), गणपत घाडगे (५२), शुभम पाडगे (२४), नाजमीन अहमद हनीफ शेख, मरजिना महंमद हमीद शेख (१५), आयशा समीर शेख (१४) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.मृतांमध्ये एक शिक्षिका, महाविद्यालयीन तरुण व चिमुकलीचा समावेश चक्काचूर व्हॅनअधिकृत प्रवासी क्षमता ७ प्रवाशांची, व्हॅनमध्ये कोंबले १६ जणउपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधरी यांनी सांगितले, ‘६-१ चा प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना वॉनमध्ये ६ प्रवासी कोंबलेले होते. चालक विनोद रोकडे ता आळेफाटा येथून प्रवासी घेऊन (एम एच १२, एचएफ ४३९३) नारायणगावच्या दिशेने ज जात होता.तर, पुण्याकडे चाललेल्या आयशर टेम्पोने (एचआर ४० एफ ५५१४) या वॉनला जोराची धडक दिली. त्यामुळे ही व्हॅन रस्त्याच्या कडेला उभ्या एसटी बसवर जाऊन धडकली. यात व्हॅनमधील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला,अपघातानंतर टेम्पोचालक फरार मृतांत चार महिला, चार पुरुष व एका बालकाचा समावेश आहे. नारायणगाव येथील आनंदवाडी शाळेत जाणाऱ्या शिक्षिका मनीषा पाचरणे यांचाही मृत्यू झाला. दोन वर्षांनंतर त्या निवृत्त होणार होत्या. युवराज वाव्हळ हा महाविद्यालयीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी नारायणगावच्या अकॅडमित जात होता, मात्र काळाने त्यालाही गाठले. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की, अपघातानंतर आयशर टेम्पोचालक पसार झाला होता . आयशर टेम्पो चालकाला काल रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अटक केलेली आहे.असून याचाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मॅक्स केअर हॉस्पिटल मध्ये असलेल्या जखमींची मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आमदार शरद दादा सोनवणे योगेश उर्फ बाबूभाऊ पाटे डॉक्टर प्रतीक पाटील यांच्याकडून विचारपूस केली. तसेच मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आमदार शरद दादा सोनवणे यांनी दिली.
Discussion about this post