प्रेस नोट……
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
चाकण, दिनांक (दिनांक – 16/01/2025 ) चाकण-शिक्रापूर रस्त्यावर आज एक भीषण अपघात घडला. एका बेकायदेशीर वेगाने जाणाऱ्या कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिस सूत्रांनुसार, कंटेनर चालकाने चाकणमधील माणिक चौकातून सुरुवात करून शिक्रापूर पर्यंत अनेक वाहनांना धडक दिली. यात पोलिसांची गाडीही समाविष्ट आहे.
दृश्ये झळकली
कंटेनर चालकाने रस्त्यावरील महिलांना उडवले.
पोलिसांचा पाठलाग असतानाही कंटेनर चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत राहिला.
नागरिकांनी कंटेनर चालकाला पकडून त्याला चोप दिला.
एक मुलीचा पाय कापला
शेल पिंपळगाव येथे या गाडीने एक मोठा ट्रक व कारला उडवले. यात दुसऱ्या ट्रक खाली कार घुसली. या कंटेनरने चाकण येथे एका मुलीला धडक दिली. त्यात तिचा पाय शरीरा वेगळा झाला.
जमाव संतप्त
अपघातानंतर जमाव संतप्त झाला. त्यांनी कंटेनरवर चढून चालकाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी धावून जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
चाकण-शिक्रापूर रस्ता धोकादायक:
चाकण-शिक्रापूर हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने खूप व्यस्त असून अनेकदा अशा प्रकारचे अपघात घडत असतात. या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.
Discussion about this post