नाशिक जिल्हा प्रतिनिधी:-
चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु शिवारातील लोणच्या डोंगर जवळ फॉरेस्ट लागत गट नं. 174 रविकिरण गोपीनाथ चव्हाण यानी राष्ट्रीय पक्षी मोर विहिरीत ष पडल्याने पाणी जास्त असल्याने मोराचे पंख भिजल्यामुळे मोराला उडता आले नाही शेतकरी दुपारच्या सुमारास विहिरी जवळून जात असताना त्यांना विहिरीजवळ फडफड आवाज आला त्यांनी बघितलं तर मोर त्यांनी लगेच वन विभागाला व वन्य पशु प्राणी मित्र श्री भागवत झाल्टे यांना माहिती दिली
वन विभाग कर्मचारी सोनाली वाघ अंकुश गुंजाळ वन्य पशु प्राणी मित्र व एस पी एन न्यूज चे प्रतिनिधी श्री भागवत झाल्टे व अंकुश गुंजाळ यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून कॅरेटच्या साह्याने विहिरीत उतरून मोराला बाहेर काढले व मोर जखमी झालेला होता व संपूर्ण पंख भिजले त्यामुळे त्याला उडणं अशक्य झाले होते पूर्णपणे कोरडे केले मोराला पुढील उपचारासाठी वागदडी येथील रोपवाटिका मध्ये वन कर्मचारी अंकुश गुंजाळ व श्री भागवत झाल्टे यांनी पोहोच केले व जखमी वरती वन कर्मचारी इरफान सय्यद यांनी फवारणी करून त्याला स्थानिक उपचार केला व पुढील उपचारासाठी डॉक्टरांना कळवण्यात आले व परिसरातील नागरिकांनी वन कर्मचारी व झाल्टे याचे आभार मानले वारंवार अशा घटना घडत असल्याने वन विभागाने जंगली प्राण्यांसाठी पिण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी वडगाव पंगु परिसरातील नागरिकांची झाल्टे यांची मागणी
वन्य पशु प्राणी मित्र भागवत झाल्टे यानी मोर हरीण व जंगली प्राण्यांणा जीवदान दिले आहेत त्यामुळे परिसरात त्यांचे वारंवार कौतुक होत आहे
त्यावेळी वन कर्मचारी RFO.आखाडे साहेब
वनरक्षक. खरात मॅडम
वनशेवक.अंकुश गुंजाळ,
विश्वनाथ झाल्टे ,
इरफान सय्यद मोराला पुढील उपचारासाठी मदत करण्यास सांगितले
Discussion about this post