यवतमाळ :-राष्ट्रीय विमुक्त घुमंतू जनजाती महासभा संघटनेत एक महत्त्वाचा बदल घडला आहे, ज्यामध्ये सौ दुर्गा सुधीर जवादे यांची यवतमाळ जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचा जल्लोष महासभेच्या सदस्यांमध्ये दिसून आला.युवा मोर्चा विदर्भ, महाराष्ट्रचे महामंत्री श्री.मुरली रामप्रकाश राठोड यांनी निवड प्रमाणपत्र देऊन सौ दुर्गा सुधीर जवादे यांची यवतमाळ जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष म्हणून निवड केली. श्री राठोड यांच्या नेतृत्वाखाली महासभेचे कार्य अधिक दृढ आणि प्रभावी होईल,असा विश्वास सर्व सदस्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या कामकाजातील उत्साह आणि समाजातील विविध समस्यांवर त्यांचे नेत्रत्व असलेले कार्य, महासभेच्या उद्दिष्टांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जवादे मॅडम यांची निवड म्हणजे एक नवीन पर्वाची सुरूवात आहे, ज्या अंतर्गत विमुक्त घुमंतू जनजाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी आणि सकारात्मक दिशा मिळेल. त्यांच्या नेतृत्वाखाली महासभेच्या कार्यक्षेत्रात नवे अध्याय लिहले जातील,अशी आशा व्यक्त होत आहे..
Discussion about this post