प्रतिनिधी:- सागर गाढवे
आज शनिवार दि.१८/१/२०२५रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोशिमघर,ता दौंड,जि.पुणे येथे बालआनंद मेळावा अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे मिळावेत म्हणून आनंदीबाजार आणि खाऊगल्ली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. यावेळी मुलांनी मेथी, पालक, टोमॅटो,वांगी,कोथिंबीर, आळू ,चिकू, पावटा यांसारख्या भाज्या विकायला आणल्या होत्या. त्याचबरोबर खाऊगल्ली मध्ये मुलांनी वडापाव,पॅटीस, ओली,सुकी भेळ,पाणीपुरी, इडली चटणी,आप्पे,गुलाबजाम, जिलेबी, भाकरवडी , चॉकलेट,बिस्किटे,आवळा लोणचे असे वेगवेगळे पदार्थ बनवले होते. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, अहो काका या ना वडापाव घ्या ना,चटपटीत भेळ खा अशा चिमुकल्यांच्या आवाजाने शाळेचा परिसर दणाणून गेला होता. बालगोपाळांनी भरवलेल्या या बाजारास गावातील पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ, पालक यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.शाळेच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार.
Discussion about this post