सोयगाव
सोयगाव तालुक्यात शेती साठी शेतकऱ्यांनी पिकांची फेरपालट करावी त्यामुळे शेतीचे व पिकांचे संतुलन राहील असे मत डॉ सूर्यकांत पवार यांनी बुधवारी तालुक्यात रब्बीच्या पिकांच्या पाहणी दरम्यान मत व्यक्त केले.
सोयगाव तालुक्यात केळी वर करपाचा प्रादुर्भाव झाल्या मुळे बुधवार (दी.१५) शास्त्रज्ञांच्या पथकाने किन्ही शिवारात या रोगाची पाहणी केली. यावेळी वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ दिलीप हिंगोले यांनी केळी वरील करपा रोगाबाबत केळी बागांचे अंतर जास्त ठेवून बागेच्या पानांवर पहाटेची सूर्य किरण पडणे गरजेचे आहे. तसेच करपलेली पाने काढून बाहेर जाळून टाकावी असे शेतकऱ्यांना सांगितले.
यावेळी या पथकाने किन्ही सह मुखेड,पळाशी,घोरकुंड, तिडका,घोसला, बहुलखेडा, जरंडी, कंकराळा,सोयगाव या दहा गावात रब्बीच्या पिकांची पाहणी करून सध्याच्या ढगाळ वातावरण मुळे रब्बीच्या पिकांवर प्रादुर्भाव झालेल्या कीडरोगाची पाहणी करून उपाय योजना सांगितल्या या पथकात प्रमुख शास्त्रज्ञ संजय पाटील सोयगावकर यांनी मोसंबी पिकांवर होणाऱ्या प्रादुर्भाव बाबत उपाय योजना सांगितल्या.
दरम्यान यावेळी डॉ सूर्यकांत पवार,डॉ संजय पाटील, डॉ दिलीप हिंगोले, डॉ रामेश्वर ठोंबरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव,तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडीले, आदींनी रब्बीच्या प्रादुर्भाव झालेल्या मका,हरभरा, ज्वारी,गहू,या पिकांची पाहणी करून उपाय योजना सांगितले. यावेळी कृषिभूषण शेतकरी रवींद्र पाटील,डॉ अविनाश पाटील,दिलीप पाटील,प्रदीप पाटील, उपसरपंच संजय पाटील,समाधान पाटील,श्रीराम पाटील,सुनील पाटील,सारंग सवाई,आदीं शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक समाधान चौधरी कृषी सहायक दत्ता मुठाळ ,बेबीचंद चौरे, मयूर बारी, विश्वजीत तायडे ,विजय निकम, कैलास कुमावत, हितेश झाडे, अक्षय सावसके, वैष्णवी भगत वैष्णवी ननावरे, आदी उपस्थित होते.
Discussion about this post