सोयगाव
येथील उपजिल्हा रुग्णालयात श्री संप्रदायाच्या वतीने शनिवारी घेण्यात आलेल्या महरक्तदान शिबिरात २६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले.
शनिवारी सोयगाव उपजिल्हा रुग्णालयात श्री संप्रदाय च्या वतीने घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराच्या सुरुवातीस अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदचार्यजी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेची पूजा व महाआरती करून प्रारंभ करण्यात आला.
सायंकाळी उशिरा पर्यंत एकूण २६१ रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केले होते.यावेळी जळगाव येथील रेड प्लस रक्तपेढी ने रक्त संकलन केले. या महा रक्तदान शिबिरासाठी तालुका व शहर श्री संप्रदाय सेवा समितीच्या सेवेकरांनी अथक परिश्रम घेतले.
Discussion about this post