उदगीर….. श्रीधर सावळे
सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, लातूर व चंगळामाता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा जानापूर (शि.)ता. उदगीर जि. लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे जानापुर येथे लातूर जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संगमेश्वर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड.बसवराज पाटील कवळखेडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर तालुक्याचे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार राम बोरगावकर, गटशिक्षणाधिकारी शेख एस के, इतर बहुजन कल्याण कार्यालयाचे एस.एन.केंद्रे, बापू चव्हाण, केंद्रप्रमुख लांडगे एम.झेड , आश्रम शाळा संघटनेचे राज्याध्यक्ष बालाजी मुंडे, केंद्रे सर, जानापूरचे व पंचक्रोशीतील सरपंच, नागरिक विविध शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक व जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड.बसवराज पाटील कवळखेडकर यांनी केले .तालुक्याचे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार राम बोरगावकर यांनी मार्गदर्शन करताना अभ्यासाबरोबर क्रीडास्पर्धेत नैपुण्य प्राप्त करण्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.यामध्ये वयोगट 14, 17 व 19 वयोगटातील मुलामुलींचे कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल,गोळा फेक, लांब उडी, उंच उडी ,धावणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामी एस टी तर आभार प्रदर्शन तोंडारे सर यांनी केले. चंगळामाता आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.

Discussion about this post