केज तालुका प्रतिनिधी गणेश इंगळे-अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज- जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम
ता.जि-रत्नागिरी (महाराष्ट्र)
यांच्या कृपाआशीर्वादाने तसेच पीठाचे उत्तराधिकारी प.पु. कानिफनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने 4 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 या कालावधी मधे संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक राज्यात भव्य महारक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे…
यावर्षी आपल्या मांगवडगाव नगरीत रविवार दि.19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 07 ते सायंकाळी 06 या वेळेत महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे,तरी मांगवडगाव पंचक्रोशी मधील सर्व ग्रामस्थांनी या महारक्तदान शिबिराला उपस्थित राहुन रक्तदान करून आपला पुण्यसंचय वाढवावा…एक रक्तदान केल्याने तीन जणांचे प्राण वाचू शकतात…
रक्तदानातून समाजातील गरजवंतांचे प्राण वाचावे ही जगद्गुरु माऊलींची संकल्पना आहे… तसेच तरी आपणा सर्वांना विनंती करण्यात येत आहे. की या भव्य रक्तदान शिबिरा मध्ये सर्वानी सहभागी व्हावे,असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ मांगवडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post