

विद्याधामच्या मुलींनी जिंकला मानाचा सांघिक फिरता चषक
शिरूर : चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शिरूर येथे दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. यामध्ये विद्याधाम शास्त्र कनिष्ठ महाविद्यालय, शिरूर मधील मुलींनी मानाचा सांघिक फिरता चषक पटकावला.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून ही स्पर्धा सुरू करण्यात आली. या स्पर्धेचे हे ३८वे वर्ष आहे. मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजू व्हावी, व्यक्तिमत्व विकास वाढावा, चर्चा करण्याची वृत्ती निर्माण व्हावी या उद्देशाने स्पर्धा सुरू करण्यात आली. या स्पर्धेत विद्याधामच्या कु बनकर वैष्णवी, कु पाचरणे श्रुतिका, कु लभडे पल्लवी, कु वाटेकर तृष्णा या मुलींनी फिरता चषक व स्मृती चिन्ह पटकाविले. या विद्यार्थिनींना श्री दिपक बनकर, श्रीमती कदम यांनी मार्गदर्शन केले.
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री निकम तसेच चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहिते, विद्याधाम शास्त्र कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पाचर्णे, पर्यवेक्षक श्री देविकर, श्री बनकर, श्री नाईक यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
Discussion about this post