
सावनेर : सावनेर जवळील मोहपा रोडवरील शेतातील ही घटना आहे. शिवाजी माडेकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला.
दिनांक १९/०१/२०२५ ला शिवाजीमाडेकर यांचा मुलगा रवी हा दुपारी दोनच्या सुमारास शेतामध्ये गेला असता शेतामध्ये असलेला विहिरीत मृतदेह पाण्यावर तरंगत असलेल्या अवस्थेत दिसला. त्याने तात्काळ सावनेर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढला.
तोताराम भूतमारे रा. सटवा माता मंदिर सावनेर असे मृतकाचे नाव आहे. तो व्यवसायाने शिक्षक असून त्यांनी आत्महत्या केली कि अजून काही याचा पुढील तपास पोलीस हवालदार कोकाटे, राजू कडू इत्यादी करत आहे.



प्रतिनिधी: सूर्यकांत तळखंडे 9881477824
Discussion about this post