तळेरे येथील वामनराव महाडीक माध्य. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये २० ते २२ जानेवारी २०२५ अशा ३ दिवशीच सिंधुदुर्ग जिल्हा स्काऊट – गाईड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील ७०० विद्यार्थी व १०० शिक्षक सहभागी होणार आहेत. या तीन दिवसांमध्ये संचलन स्पर्धा, शोभायात्रा, गाठींची स्पर्धा,बिनभांड्यांचा स्वयंपाक, शेकोटीचा कार्यक्रम, धाडसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे नियोजनबद्ध कार्यक्रम होणार आहेत.
तरी या ३ दिवशीय स्काऊट-गाईड मेळाव्यासाठी उपस्थित राहून सर्व मुलांना प्रोत्साहन द्यावे असे नम्र आवाहन वामनराव महाडीक विद्यालयाचे प्राचार्य. श्री. अविनाश मांजरेकर यांनी केले आहे.

Discussion about this post