उपविभागीय अधिकाऱ्यांचे तहसीलदारांना पत्र
सुनील झिंजुर्डे पाटील
गंगापूर तालुक्यातील शिंगी ते झोडेगाव हा जुना रस्ता आता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. जवळपास 90 च्या दशकात या रस्त्यावर काटेपिंपळगाव ते गंगापूर बस सुरू होती तसेच अनेक शेतकऱ्यांच्या या रस्त्यालगत शेतवस्त्या आहे.सुमारे 70 ते 100 लोकांच्या या रस्त्यालगत शेत वस्त्या तसेच घरे आहे. या रस्त्यालगत काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असून वारंवार त्यांना सूचित केले आहे. तरी रस्ता मोकळा करून द्यावे असे उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदारांना पत्राद्वारे कळविले आहे.या रस्त्यालगत असंख्य शेतकऱ्यांचे शेत वस्ती असून या रस्त्यालगत अतिक्रमण हे वाढले आहे. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटसरूंना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून रस्ता रहदारीस मोकळा करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्याकडून होत आहे.
तहसीलदारांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष
शिंगी ते झोडेगाव या रस्त्यालगत मोठमोठाले अतिक्रमण वाढले असून शेतकऱ्यांच्या अर्जाची उपविभागीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे.या मागणीवर उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार यांना पत्र पाठवले असून तहसीलदार यावर कशी कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Discussion about this post