- सावित्री-फातिमा-जिजाऊ जन्मोत्सव साजरा
- मान्यवरांचा पुरस्कार देऊन झाला गौरव
वडवणी – प्रतिनिधी
वडवणी येथील सामाजिक सेवेत सतत सक्रिय असलेले दांपत्य तेजस शिंदे (मनुष्य) व त्यांच्या पत्नी सारिका शिंदे (मनुष्य) आणि मित्रपरिवार यांच्या पुढाकारातून वडवणी येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकात दहा दिवसीय सामाजिक सेवेचा संविधान दस्ताह संपन्न झाला सावित्रीबाई फातिमा जिजाऊ जन्मोत्सव या कालावधीत मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आद्य शिक्षिका शेख फातिमा, स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करताना दस्तांहची सांगता शाहिरी व पुरस्कार वितरण सोहळ्याने झाली झाली. दहा दिवस चाललेल्या या दस्ताह सोहळ्यात दररोज अनुक्रमे पहिल्या दिवशी मशाल रॅली काढून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यात आले, दुसऱ्या दिवशी अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर व सिंधुताई सपकाळ यांच्या विषयी प्रख्यात व्याख्याते प्रा. प्रकाश खळगे सर यांनी आपले विचार मांडले, तिसऱ्या दिवशी मुक्ता साळवे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य या विषयी प्रख्यात व्याख्याते तथा चित्रपट निर्माते दिग्दर्शक प्रा. श्रीनिवास काकडे सर यांनी आपले व्याख्यान दिले. चौथ्या दिवशी बुद्ध, संत कबीर, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत याविषयी सहशिक्षक ज्ञानेश्वर राऊत सर यांनी व्याख्यान दिले. पाचव्या दिवशी खरे वारकरी कोण? ऐसे कैसे झाले भोंदू? याविषयी दैनिक वास्तवचे उपसंपादक तथा पिंपरखेडचे सरपंच पत्रकार अशोक निपटे सर यांनी सविस्तर कीर्तन रुपी सेवा दिली.
सहाव्या दिवशी शेतकऱ्यांच्या, महिलांच्या, युवक- युवतींया समस्या व त्यावरील उपाय याविषयी शेतकरी नेते इंजिनीयर जगदीश फरताडे सर यांनी आपले विचार व्यक्त केले. सातव्या दिवशी आद्य शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त शेख बाबा व तांबोळी सर यांनी आपले विचार व्यक्त केले. आठव्या दिवशी संविधानाचे महत्त्व व इंडियन पिनल कोड न्यायालय व पोलीस प्रशासनाचे कार्य याविषयी प्रा. तेजस मनुष्य यांनी मार्गदर्शन केले. नवव्या दिवशी सर्वधर्माचे तत्त्वज्ञान व मानवतावादी दृष्टिकोन याविषयी प्रा. श्रीनिवास काकडे यांनी व्याख्यान दिले. दहाव्या दिवशी या दस्ताहासोळ्याची सांगता झाली. राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त शाहिरी कार्यक्रम भागवत उजगरे यांनी केला व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला. माऊली महाराज बेदरकर व बुवासाहेब शिंदे यांना वडवणी भूषण हा पुरस्कार देण्यात आला.
वडवणी संविधान दस्ताह निमित्त दहा दिवसांचा हा कार्यक्रम करण्यासाठी वडवणीतील प्राध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग, कर्मचारी, पत्रकार, वकील संघ, होस्टेल संचालक इत्यादींनी दररोज कार्यक्रमात सहभाग नोंदवला
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यशोधक समाज, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, एस एफ आय, भालेराव मित्र मंडळ, वारकरी चळवळ, लढा दुष्काळाशी फाउंडेशन यांनीही सहकार्य केले. शौन शौर्य उद्योग समूह येथे सावित्रीबाई फुले स्मारक समोर हा कार्यक्रम दस्ताह सफल केला. यशस्वीतेसाठी तेजस मनुष्य, सारिका मनुष्य, पत्रकार अशोक निपटे, प्राध्यापक श्रीनिवास काकडे, अशोक फपाळ, ज्ञानेश्वर राऊत, वैजनाथ शिंदे, हनुमंत म्हात्रे, अँड राज पाटील आदींनी सहकार्य केले.
चौकट
बेदरकर गुरुजी व बुवा साहेब अंकल यांना वडवणी भूषण पुरस्कार
या दस्तासोळ्यात वडवणी तालुक्यातील नामवंत कीर्तनकार तथा संत भगवान बाबा, संत भीमासिंह बाबा यांचे शिष्य ह भ प माऊली महाराज बेदरकर गुरुजी तसेच सामाजिक कार्यकर्ते बुवासाहेब शिंदे उर्फ अंकल यांना वडवणी तालुका भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
चौकट
तेजस मनुष्य यांना दीन मित्र पुरस्कार
या दस्ताह सोहळ्याचे संयोजक तेजस मनुष्य यांना या कार्यक्रमातील मान्यवरांच्या वतीने दीनमित्र हा पुरस्कार यावेळी देण्यात आला. दीनदुबळ्यांसाठी काम करणारे तेजस मनुष्य आणि सारिका मनुष्य यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
Discussion about this post