
न्हावेली / वार्ताहर जाणता राजा, हिदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव बुधवार १९ फेब्रुवारी साजरा होत आहे. यनिमित्त भिल्लवाडी ग्रुप (अध्यक्ष पांडुरंग राऊळ), मळगाव ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यनिमित्त पहाटे ५.०० वाजता हनुमंत गड फुकेरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत मशाल रॅली, सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक सोहळा, दुपारी ४ ते ६ वाजता होळकर घर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत मोटरसायकल व ढोल ताशा पथक, सायंकाळी ६ ते ७ वाजता लेझीम नृत्य, वेशभूषा व वकृत्व स्पर्धा, सायंकाळी ७ ते ८ वाजता स्नेहभोजन व महिला पैठणी व संगीत खुर्ची खेळ रात्री ८ ते ९ वाजता मर्दानी खेळ, बक्षीस समारंभ व आभार प्रदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी पांडुरंग राऊळ-९९६७३३३१०० व ८१०८५८५४७२ यांच्याशी संपर्क साधावा. ग्रामस्थ सर्व मळगाव शिवप्रेमींनी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेत कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन भिल्लवाडी ग्रुप, अध्यक्ष तथा समाजसेवक पांडुरंग राऊळ, ग्रामविकास मंडळ मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post