- वडवणी शहरातील नावाजलेले चौंडेश्वरी कोचिंग क्लासेस चे एन एम एम एस परीक्षेत सलग चौथ्या वर्षीही सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राष्ट्रीयदृष्ट्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत इयत्ता बारावी पर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना आहे.
- इयत्ता आठवी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा नुकतीच घेण्यात आली होती आणि त्याचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. त्या परीक्षेत चौंडेश्वरी कोचिंग क्लासेस ची विद्यार्थिनी अनुष्का वैजिनाथ डिगे ( गुण १३० ) घेऊन तालुक्यात प्रथम आलेली आहे.
- तर याच क्लासची विद्यार्थिनी प्रांजल गुरूप्रसाद रेडेकर ( गुण ११८ ) ही तालुक्यातून द्वितीय तसेच वेदिका निरंजन बोंगार्डे ( गुण ११२) ही विद्यार्थिनी तालुक्यातून तृतीय आलेली आहे. त्याबरोबरच क्लासेसच्या एकूण ३४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्यामध्ये दराडे अस्मिता अशोक, पवार रुद्राक्ष अनिलकुमार, तिडके सुमित संजय, दिवटे संस्कृती सचिन, आनेराव आदिती निलेश, गुरसाळी गौरव गणेश, चव्हाण विराज विक्रम, मुंडे गोरख नवनाथ, रोकडे कुणाल दिगंबर, भागवत सिद्धी अरुण, घुमरे श्रीराज बालनाथ, झाडे श्रावणी सुरेश, वरवडे जानवी परमेश्वर, बोंदार्डे सौजन्य संतोष, उजगरे श्रावणी नितीन, गार्डी श्रीपाद योगेश, टकले समृद्धी गणेश, टकले खुशी धुराजी, लांडे गौरी मधुकर, नाईकवाडे शिवानी आप्पाराव, वाव्हळ आर्यन लक्ष्मण, चौरे अक्षरा रमेश, दावडकर अक्षरा गणेश, तिडके अमृता सत्यप्रेम, उजगरे कार्तिक हनुमंत, भुजबळ गायत्री धनराज, इंगळे पवन बालाजी, कप्पे हर्षदा मंचक, शेख अमन मुबारक, गोंडे सिद्धार्थ विलास, घुमरे केशव चक्रधर इत्यादी विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले आहे.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना चौंडेश्वरी कोचिंग क्लासेस चे सुरज टोम्पे सर आणि तुकाराम दिवटे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तालुका स्तरातून कौतुक होत आहे.
Discussion about this post