


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेडद येथे रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला .
दि – 20 /8 / 2024
मुलां -मुलींनी स्वतःच्या हाताने राख्या बनवून आणल्या . मुलींनी मुलांना राख्या बांधल्या . तसेच प्राणवायू ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षबंधुला (झाडांना ) सुद्धा राख्या बांधल्या . वृक्षांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा मनोमन घेण्यात आली .
खरोखर झाडें लावा झाडें वाचवा.ही भावना सतत समाजात निर्माण करण्याचे कार्य जि.प.प्राथ.शाळा वेडद चे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी करीत आहे.वृक्षाबद्दल असलेले प्रेम विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नेहमी प्रत्यक्षरीत्या दिसून येतात.
त्यांच्या या वृक्ष रोपण संरक्षण कार्यामुळे समाजाला खुप साऱ्या प्रेरणा मिळाल्या आहे.आणि हे कार्य टिकवून ठेवण्यासाठी वेडद शाळेचे मुख्याध्यापक श्री.लोहकरे सर, श्री.पेंदोर सर ,आणि तेजस बोरकर आणि शाळेचे सर्व चिमुकले विद्यार्थी अगदी मनापासुन करत आहे.शेवटी गोड चॉकलेटने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मते वृक्ष हा सर्वस्वी आहे कारण तो सर्वांना ऑक्सिजन देतो.सर्वांना सावली देतो.
फुल देतो फळ देतो अजून भरपूर काही देतो.म्हणजे तो आपल्या आई बाबा ,भावाप्रमाणे सोबत असतो.आणि महत्वाचं म्हणजे तो सर्वांसाठी सारखाच असतो.म्हणजे कोणातंही तो भेदभाव करत नाही.असे तेथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे सांगितले.……..
Discussion about this post