अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी :- वैभव फरांडे (9356204072)
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आले आहे. वीसाव्या हप्त्यापासुन नवीन नियम लागू करण्यात आले असुन ज्यामध्ये शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहेत. खरं तर, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत, महाराष्ट्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधार लिंक करण्याची आणि शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे.
पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी विस्तारित केलेला गेला या हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांकाची अट लागू नसल्याने हा हप्ता शेतकऱ्यांना विनंती पणे मिळाला आहे. मात्र आता 20 व्या हप्त्यापासून शेतकरी ओळखपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक होणार आहे.तथापि, नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, पती-पत्नी आणि १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील सदस्यांची आधार नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. नियमांचे पालन केले नाही तर पीएम किसानचे पैसे मिळवण्यास शेतकरी पात्र ठरणार नाहीत असे हे आदेश आहेत.
नोंदणीसाठी मनस्ताप
■ शासनाच्या आदेशामुळे मागील काही दिवसांपासून शेतकरी फार्मर आयडी तयार करण्यासाठी सीएससी केंद्रावर धाव घेताना दिसून येत आहेत. दुर्गम, ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी तालुका मुख्यालय गाठून ओळखपत्र तयार करीत आहेत. यात त्यांना शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांची धावाधाव
1. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत राज्य शासनाने नुकताच सर्व शेतकऱ्यांना युनिक फार्मर आयडी तयार करण्याचे आदेश दिले आहे.
2. याअंतर्गत शेतकऱ्यांसाठी नोंदणी क्रमांक आणि पूर्वीचा ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यामध्ये शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिक करावे लागणार आहे.
3. यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांची केवायसी आणि ओळखपत्र तयार करण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे. नोंदणीसाठी शेतकरी सीएससी केंद्रांवर शेतकरी वर्गाची गर्दी उसळलेली दिसून येत आहे.
Discussion about this post