
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उबाठा गट स्वबळावर लढणार ▪️पत्रकार परिषदेत मापारी व जाधव यांची माहिती▪️
लोणार ता प्र सुनिल वर्मा :-लोणार : येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तसेच लोणार नगरपालिकेची निवडणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने स्वबळावर लढाव्यात, असे पक्षाच्या झालेल्या तालुका बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत शिवसेनेचे तालुकाप्रमुख अॅड. दीपक मापारी व शहर प्रमुख गजानन जाधव यांनी दिली.शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नितीन देशमुख, नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या आदेशान्वये लोणार तालुका शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक ११ फेब्रुवारी रोजी पार पडली. या बैठकीमध्ये लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. तालुक्यातील संघटनेचे काही पदाधिकारी पक्षाच्या बैठकीला वारंवार गैरहजर राहतात तसेच पक्षविरोधी कारवाई करतात तर काही पदाधिकारी पक्षाचे काम न करता त्यांनी पदे अडकवुन ठेवलेले आहेत, अशा निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे सर्वानुमते बैठकीत ठरवण्यात आले.लोणार महोत्सव व्हावा म्हणून मंत्रालयात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला माजी आमदार, व व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी यांनी सहभाग घेतला. परंतु विद्यमान आ. सिद्धार्थ खरात यांना डावलण्यात आले, याबाबत पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला. यावेळी सुदन अंभोरे, कैलास अंभोरे, शेख लुकमान, तानाजी अंभोरे, तानाजी मापारी, श्रीकांत मादनकर, संतोष घायाळ उपस्थित होते. ▪️निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार▪️तालुक्यातील काही पदाधिकारी इतर पक्षाची जवळची साधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खच्चीकरण करत आहे व पक्षाने बोलवलेल्या बैठकीला सातत्याने गैरहजर राहतात अशा या पदाधिकाऱ्यांनी स्वतः पदाचा राजीनामा द्यावा.अन्यथा एक ठराव घेऊन आम्ही पक्षश्रेष्ठीकडे पाठविला आहे व त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल.गजानन जाधव शहरप्रमुख (उबाठा) लोणार
Discussion about this post