रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी वीरवाडी येथे हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि श्री. गणेश कला नाट्य मंडळ वीरवाडी यांच्या संयुक्त विध्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती सोहळा मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहचवण्याचे उद्दीष्ट समोर ठेऊन हे मंडळ गेली २१ वर्ष हा उत्सव मोठया जल्लोषात साजरा करतात. यावर्षी या उत्सवाची सुरुवात १८ फेब्रुवारी २०२५ रोजी किल्ले जयगड येथे स्वच्छता मोहीम करून होणार आहे. तसेच १९ फेब्रुवारी २०२५ रोजी ठिक सकाळी ६ वाजता शिवरायांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्या नंतर सकाळी ७ वाजता किल्ले जयगड ते वीरवाडी कळझोंडी भव्य -दिव्य शिवज्योत मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता छत्रपति शिवाजी महाराजांची प्रतिमा पुजन आणि अभिषेक सोहळा व ज्योत पुजन करण्यात येईल.सकाळी १० वाजता शिव आरती करून त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर सायंकाळी ६ वाजता महाशिवआरती करून उपस्थित मान्यवरांचे भाषणे व शाहिरांचे पोवाडे तसेच शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन श्री गणेश कला नाट्य मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.तरी सर्व समाजातील शिवप्रेमींनी या शिवजयंती सोहळयास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
Discussion about this post