मराठवाडा वैजापूर तालुक्यातील डोनगाव येथील बाबतरा हद्दीतील विज वितरण विद्युत महामंडळाची डि पी गेली दहा पंधरा दिवसांपासून नादुरुस्त झाल्याने बंद होती.त्यामुळे तेथील शेतकरी बांधवांचे ऊस.गहु. कांदा.गोधनचारा .हिरवा घास. पिण्याच्या पाणी. पिकांच्या पाण्या अभावी सुकत चालले होते.डोनगाव येथील काही शेतकरी बांधवांनी आपली समस्या काल पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांच्या कानावर घातली असता त्यांनी तत्परतेने कन्नड येथील संबंधित अधिकारी व शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनिलभाऊ सोनवणे यांना फोन वरून समस्या सांगुन विनंती केली असता.आज तातडीने डि पी येऊन विज प्रवाह सुरळीत होऊन.शेतकरी बंधुचा प्रश्न सुटल्या बरोबर डोनगाव.बाबतरा हद्दीतील शेतकरी बांधवांनी वरील सर्वाचे आभार मानुन तत्पर शिवसेना व कर्तव्यदक्ष शिवसैनिक म्हणून अभिनंदन करत शिवसेना पक्षा विषयी कृतज्ञता व्यक्त केली. यापुर्वी ही मागिल दोन वर्षापुर्वी या जुंगा हद्दीतील डि पी खराब झाली असता.पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी दखल घेऊन शेतकरी बांधवांचे मदतीला धावून तत्परतेने विज प्रवाह सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले होते.
Discussion about this post