विहिरगांव प्रतिनिधी:-रजत चांदेकर

(व्याख्यान, रॅली, विविध स्पर्धांचे आयोजन) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त शिवशक्ती युवा बहुउद्देशीय संस्था धानोरा, यांच्या वतीने दिनांक१७, १८ व १९ फेब्रुवारी रोजी हनुमान मंदिराजवळ धानोरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७ फेब्रुवारीला या उत्सवाचे उद्घाटन वडकी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुखदेव भोरखडे यांचे हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ जयपाल पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा, बाबाराव घोडे ( माजी मुख्याध्यापक ) व गणेश वरूडकर शिक्षक धानोरा हे राहणार आहे,सायंकाळी सात वाजता व्याख्यानकार राज दाजने यांचे शिव चरित्रावर व्याख्यान आयोजन करण्यात आले आहे. व हरी भक्त पारायण राजु विरंदडे महाराज राष्ट्रीय किर्तनकार यांचे शिवचरित्रपर किर्तन,दि,१८ तारखेला संध्याकाळी ७:३०ते ११ संप्तखंजेरी वादक दिपक भांडेकर महाराज यांचे पंचंरगी प्रबोधनात्मक कार्यक्रम ,तर दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व भव्य रॅली काढण्यात येणार आहे, तर सध्यांकाळी दरवर्षी प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांचे सांकृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे तरी या सर्व कार्यक्रमास तालुक्यातील जास्तीत जास्त शिवभक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post