
हातकणंगले येथील दुय्यम निबंधक दिलीपकुमार काळे यांच्या वर्तनाबद्दल तक्रारींचा उल्लेख करून यांची बदली करावी अशा मागणीचे निवेदन हातकणंगले दस्तलेखनिक आणि मुद्रांक विक्रेते संघटनेने सह जिल्हा निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी यांना दिले.
दुय्यम निबंधक दिलीपकुमार काळे कार्यालयात आलेल्या पक्षकाराशी अपमानास्पद भाषा वापरतात, त्यांच्या केबिनचे दार बंद करून पक्षकारांनां केबिनबाहेरच वाट पाहत ठेवतात आणि सकाळी १०:०० वाजता दस्त नोंदणीला सुरुवात करण्या ऐवजी दुपारी १२:३० वाजता दस्त नोंदणी प्रक्रिया सुरू करून दस्त नोंदणीला विलंब करतात असा संघटनेचा आरोप आहे. त्यांच्या कारकिर्दीत, त्यांच्या कृतींबद्दल माहिती अधिकार अर्जांमध्ये वाढ झाली आहे.
पक्षकाराचे दस्त हे काळे आपल्या केबिनबाहेर ठेवण्याचे आणि कागदपत्रे बाहेरून हाताळण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना देतात, कारण ते त्यांच्या सोयीनुसार त्यांची मागवून घेत असतात असा संघटनेचा दावा आहे, .त्यांच्या बदलीची याचिका जिल्हा निबंधक वर्ग २, करवीर क्रमांक २, धनंजय जोशी यांच्याकडे सादर करण्यात आली.
यावेळी मुद्रांक विक्रेता व दस्त लेखनिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अनिल बनकर यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य रावससे साकेकर, संघटनेचे कोल्हापूर शहराध्यक्ष श्रीधर पाचापुर, शहराध्यक्ष नितीन पवार, करवीर अध्यक्ष बुद्धिवान कदम, हातकणंगले संघटना अध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष दिलीप धनवडे, खजिनदार अश्विन कुमार चव्हाण, प्रकाश पांडव, कुमार चव्हाण सहित सर्व मुद्रांक विक्रेता व लेखनिक यांच्याबरोबर ऍडव्होकेट कोतेकर उपस्थित होते.
Discussion about this post