पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव भेलके महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सायली दामगुडे व अनुजा वाल्हेकर यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. अनुजा दत्तात्रय वाल्हेकर ही शेतकरी कुटुंबातील असून ॲथलेटिक्स क्रॉस कंट्री या खेळामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता तसेच अंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये विभागीय स्पर्धेपर्यंत तिची निवड झाली होती, त्याचबरोबर कबड्डी व खो-खो या खेळात आंतर महाविद्यालयीन पातळीवर सहभाग घेतला होता. राष्ट्रीय छात्र सेनेची ही विद्यार्थिनी आहे अत्यंत मेहनती व कष्टाळू खेळाडू आहे तिचे आई वडील दोघेही शेतकरी आहेत पोलीस भरतीच्या पहिल्या प्रयत्नात अपयश आले असतानाही परत पुन्हा प्रयत्न करून अत्यंत जिद्दीने तिने हे यश मिळवले आहे.सायली दामगुडे हिने अतिशय बिकट परिस्थितीत वाट काढत नोकरी करत मुंबई पोलीस दलात तिची निवड झाली आहे तसेच महाविद्यालयात असताना तिने अथलेटिक्स मध्ये विभागीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे त्याचबरोबर फुटबॉल कबड्डी खो-खो या सांघिक खेळातही ती सहभागी झाली आहे. सायली दामगुडे हिची आई कविता दामगुडे हिने आई वडिलांची कामगिरी पार पाडत सायलीला भक्कम पाठिंबा दिल्यामुळे तिला पोलीस भरतीमध्ये यश संपादन करता आले..अथलेटिक्स व क्रॉस कंट्री या खेळाकरता सुधांशू खैरे यांनी या दोघींना मार्गदर्शन केले त्याचबरोबर इतर सांघिक खेळाकरता महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. पौर्णिमा कारळे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. या विद्यार्थिनी महाविद्यालयातील 200 मीटर ट्रॅकवर गेली चार वर्षे सराव करत होत्या तसेच महाविद्यालयातील जिमचाही त्यांनी वापर केला त्याचबरोबर महाविद्यालयातील अभ्यासिकेतही त्या जास्त वेळ बसून अभ्यास करत होत्या. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. भगवान गावित यांनी स्पर्धा परीक्षा अभ्यास करण्यासाठी त्यांना जास्त वेळ बसण्याची परवानगी दिली होती. शंकरराव भेलके महाविद्यालयाचे बरेच विद्यार्थी यापूर्वी पोलीस खात्यात तसेच सैन्य दलात भरती झाले आहेत तर काही विद्यार्थी गिर्यारोहक व क्रीडा मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहेत. महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांना महाविद्यालयातच सर्व सुविधा मिळाव्यात त्या दृष्टीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे नेहमीच कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील आपला विद्यार्थी सर्वोच्च पदापर्यंत पोहोचावा अधिकारी व्हावा हाच मानस ठेऊन महाविद्यालय कार्य करीत असून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात दिल्या जाणाऱ्या सोईंचा उपभोग घेऊन आपला विजय निश्चित करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.महाविद्यालयाच्या या गुणी खेळाडूंचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, सचिव मा. संदीप कदम, उपसचिव मा. एल. एम. पवार, खजिनदार मा. मोहनराव देशमुख, सहसचिव प्रशासन मा. ए.एम. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. पौर्णिमा कारळे, श्री शिवाजी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक संजय यादव, क्रीडाशिक्षक विलास धेंडे, बनेश्वर क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉक्टर खरे क्रीडा प्रशिक्षक सुधांशू खैरे, महेंद्र सावंत, पत्रकार किरण बधे त्याचबरोबर वाल्हेकर कुटुंबीय व कामथडीचे ग्रामस्थ दामगुडे कुटुंबीय व कोळवडीचे ग्रामस्थ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी या सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरता त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Discussion about this post