मिरजेतील जुन्या शाळांमधील एक मिरज विद्या समितीची विद्यामंदिर प्रशाला या शाळेमधून आजतागायत हजारो विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे धडे घेऊन जगभरामध्ये शाळेचे नाव सुवर्ण पानावर लिहिले आहे. जगभरात विविध क्षेत्रामध्ये या शाळेचे विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोचले आहेत. नुकताच इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांचा सहृदय निरोप समारंभ पार पडला. विद्यार्थ्यांच्या मनात एकच काहूर होती आता आपले मित्र आपल्याला भेटणार नाहीत. काही विद्यार्थ्यांना तर आपल्या मनोगतामध्ये आपल्या वर्गशिक्षकांप्रती आभार व्यक्त करताना कंठही दाटून आले. इयत्ता पाचवी पासून दहावी पर्यंत चा प्रवास ‘विद्यामंदिर’ च्या रेल्वे मधून सुखकर आणि समाधानी झाला. मिरज विद्या समितीचे अध्यक्ष शैलेश देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची चाललेली यशस्वी वाटचाल काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. निरोप समारंभाच्या या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक राजीव कुलकर्णी होते.स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक अमृतकुमार शितोळे यांनी केले.यावेळी उपमुख्याध्यापक सर्जेराव महाजन, पर्यवेक्षिका संगीता कानडे उच्च माध्यमिक विभागाचे संतोष साखरे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष शैलेश देशपांडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना यशासाठी शुभेच्छा दिल्या.इ.१०वी अ चे वर्गशिक्षक श्री.प्रदिप कोळी व दहावी च्या विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी मनोगत व्यक्त केले. अजय मिरजकर यांनी सूत्रसंचालन केले.रश्मी जोशी यांनी आभार मानले.यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post