
मारेगाव येथील तहसीलदार यांनी पीसगाव कुंभां या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधला…
मारेगाव तालुक्यातील पीसगाव कूंभा येथे शुक्रवार रात्री १०.१० वाजता भूकंपाचा धक्का जाणवला असून नागरिकांनी सांगितले व भीतीचे वातावरण निर्माण झाले.आणि काही नागरिक घराबाहेर येऊन थांबले. पिसगाव येथील नागरिक व कुंभा येथील सूरावार यांनी तहसीलदारांना सकाळी फोन करून सांगितले, तहसीलदार उत्तम नीलावर यांनी तात्काळ पिसगाव कुंभा या ठिकाणी भेट घेऊन नागरिकांशी चर्चा केली. तालुक्यात काल रात्री काही भागात १०.१५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. सोशल मीडिया आणि नागरिक मध्ये या संदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तालुका प्रशासन यांनी जिल्हा परीक्षक कक्षाला माहिती दिली.
Discussion about this post