

श्रीकांत खोमणे प्रतिनिधी – दि १७ रोजी ग्रामपंचायत उंडवडी सुपे ता बारामती जि पुणे येथे उपसरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया ग्रामसेवक विनोद आटोळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सरपंच शोभा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रियेचे आयोजन केले.मा उपसरपंच अनिल गवळी यांनी उपसरपंचपदासाठी दुसऱ्यांना संधी मिळावी म्हणून सदर पदाचा राजीनामा दिला.यावेळी उपसरपंच पदासाठी अश्विनी राजेंद्र मांढरे यांचा एकमेव अर्ज आल्याने नियोजित वेळेनुसार अश्विनी मांढरे यांची बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी,ग्रामसेवक विनोद आटोळे यांनी केली.यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मा उपसरपंच अनिल गवळी,ग्रामपंचायत सदस्या रोहिणी गवळी, राणी गवळी,लता जगताप , गोरख गवळी, माजी सरपंच विनायक गवळी,उंडवडी विविध कार्यकारी सह सोसायटीचे चेअरमन बापुराव गवळी,बाभुळसर बु येथील मनोहर मचाले चेअरमन संत तुकाराम वि का सोसायटी,संचालक अमोल नागवडे उपाध्यक्ष पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय बाभुळसर बु, युवा कार्यकर्ते निलेश नागवडे,नवनाथ मांढरे, संजय मांढरे, अनिल गवळी, संतोष गवळी,संतोष जगताप, मोहन गवळी,आप्पासो मांढरे, राजेंद्र मांढरे, अनिल भगत, ननु भगत ,तसेच ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच उंडवडी गावाच्या विकासासाठी काम करणार ,तसेच गावपातळीवरील सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करणार असल्याचे मत अश्विनी राजेंद्र मांढरे यांनी यावेळी व्यक्त केले.सर्व उपस्थितांचे आभार मा सरपंच विनायक गवळी मानले.
Discussion about this post