

उदगीर:-श्रीधर सावळे
उदगीर ग्रामीण येथील दाखल गुन्हयातील अल्पवयीन मतीमंद मुलास शोधुन सुखरुप आईचे ताब्यात
दि.09/02/2025 रोजी तक्रारदार नामे उषाबाई शिवकुमार डोगरे वय 30 वर्षे रा.बेळकुनी ता. औराद जि.बिदर ह.मु. संतकबीरनगर कल्पनाचौक उदगीर जि.लातूर यांनी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे येवून तक्रार दिली की त्याचा मतीमंद मुलगा नामे शुभम शिवकुमार डोंगरे वय 12 वर्षे हा दि.08/02/2025 रोजी सकाळी 09.30 वा.चे सुमारास संत कबीर नगर कल्पना चौक उदगीर येथील घरातुन खेळायला जावून येतो म्हणुन निघुन गेला तो परत घरी आलाच नाही त्याचा आजपावेतो शोध घेतला आसता मिळून आला नाही त्यामुळे त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे वगेरे तक्रारीवरुन पोस्टें उदगीर ग्रामीण येथे गुरनं, 72/2025 कलम 137(2) बी.एन.एस.प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.सदर गुन्हा वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी साहेब यांचे सुचनेनुसार सपानि बहात्तरे यांनी केला आसुन त्यांनी मतीमंद अल्पवयीन मुलगा बेपत्ता झालेपासुन लागलीच माहीती गोळा करुन सी.सी.टी.व्ही फुटेजचे आधारे व मल्टीमीडीयाचे माध्यमातुन स.पो.नि बहात्तरे व त्यांचे मदतनीस पोना 95 स्वामी यांनी सदर मुलाचा शोध घेतला आसता अल्पवयीन मतीमंद मुलगा हा गुलबर्गा राज्य कर्नाटक येथे मिळुन आला आसुन सदरील मुलास त्याचे आईचे ताब्यात सुखरुप दिले आहे.सदर गुन्हयाचा तपास हा मा. पोलीस अधिक्षक श्री. सोमय मुंढे साहेब, अपर पोलीस अधिक्षक श्री. अजय देवरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मनीष कल्यानकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. श्रीराजकुमार पुजारी यांचे सुचनेनुसार स.पो.नि.विशाल बहात्तरे, पोना 95 सिध्देश्वर स्वामी, पोका 385 नजीर बागवान यांनी केला आहे.
Discussion about this post