
दावडी (ता. राजगुरुनगर, पुणे) येथील गणेश डी. वाव्हळ यांनी कृषी प्रक्रिया उद्योगात नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या आई, ज्योती दिलीप वाव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी व्यवसाय सुरू केला. वडिलांच्या अकाली निधनानंतर आईने गव्हाची पारंपरिक गिरणी चालवत कुटुंबाचा आधार घेतला, याच संघर्षातून गणेश यांना व्यवसायाचे बाळकडू मिळाले.
सुरुवातीला त्यांनी भाजीपाला विक्रीत प्रयत्न केला, मात्र तोट्यामुळे तो बंद करून वाहतूक क्षेत्रात काम केले. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन, २०१९ मध्ये कृषी प्रक्रिया उद्योग सुरू केला. बाजरी, ज्वारी यावर प्रक्रिया करत, ₹५०,००० गुंतवून गव्हाच्या बॅग भरण्याचे यंत्र घेतले.
“यश कठोर परिश्रम आणि सातत्याने मिळते,” असे गणेश म्हणतात. त्यांच्या उद्योगामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. त्यांनी शेतमाल वाहतुकीचा व्यवसायही सुरू केला.
त्यांचा हा प्रवास मेहनत, जिद्द आणि नाविन्याचा उत्कृष्ट नमुना आहे. पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत हर्षल घाडगे, गौरव बिरारी, वितराग गांधी, रोहन लोंढे, स्पंदन जिबेंनकर,सत्चीत बैंडला यांनी त्यांच्याशी संवाद साधला..
Discussion about this post