
खेड तालुक्यातील दावडी गावात कृषीदुतांनी माती परीक्षण प्रात्यक्षिक सादर केले.
ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित, पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी येथील विद्यार्थी हर्षल घाडगे, गौरव बिरारी, स्पंदन जिभेंकर, सत्चीत बैंडला, रोहन लोंढे,वितराग गांधी या कृषिदुतांनी दावडी येथे माती परीक्षण प्रात्यक्षिक करून दाखविले.
दावडी परिसरात शेतकऱ्यांमध्ये माती परिक्षणाची जनजागृती व्हावी यासाठी उपक्रम राबविण्यात आला.
उपक्रमासाठी प्राचार्य प्राजक्ता मोडक, कार्यक्रम समन्वयक डॉ.प्रशांत घाडगे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ.अविनाश खरे व प्रा.नवलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
● शेतकऱ्यांना मार्गदर्शन ●
माती परीक्षण करण्यासाठी शेतातील पिके काढल्यानंतर, पेरणीपूर्वी,रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यावर तीन महिन्यानंतर मातीचा नमुना घेऊन माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषिदुतांनी शेतकऱ्यांना दिला.प्रशिक्षणात शेतीतील नमुने गोळा करून त्यांचे परीक्षण करण्यात आले. कृषिदुतांनी मातीमध्ये असणारे घटक,जमिनीची क्षमता, मातीचा प्रकार याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले..
Discussion about this post