

झारगडवाडी: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज निर्माण करताना अठरा पगड जातींना विश्वासाने बरोबर घेऊन आम्ही एका आईची लेकरं आहोत..हा देश आमचा आहे आणि आम्ही या देशाचे आहोत या विशाल विचारांचे घराघरात मंथन झाले पाहिजे. असे मनोगत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी व गावचे सुपुत्र निकम साहेब यांनी झारगडवाडी येथे संपन्न झालेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव कार्यक्रमांत बोलताना केले.
यावेळी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. दयाराम महाडिक, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.नारायण कोळेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्री. राजेंद्र बोरकर, सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.या सर्वांचे हस्ते शिवपुजन करण्यात आले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच राणा प्रताप क्रिडा मंडळाचा खेळाडु व झारगडवाडी गावचा सुपुत्र चि. उत्कर्ष मासाळ यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमास झारगडवाडी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post