💐जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेडद . # 2714161101# चा सांस्कृतिक कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम संपन्न .💐
कार्यक्रमाची रूपरेषा –
1) सकाळी ठिक 8 .00 वाजता प्रभातफेरी , झाकी प्रदर्शन , लेझिम .
2) दुपारी ठिक 3 .00 वाजता माता -पिता पुजन व आशिर्वाद कार्यक्रम .
3) दुपारी ठिक 4 . 00 आनंद मेळावा .
4) रात्री ठिक 8 .00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम .
दि – 16/02/2025 ला सकाळी ठिक 8 .00 वाजता शाळेतून समस्त पालक व गावकऱ्यांच्या उपस्थितीत प्रभातफेरी पार पडली . समस्त ग्रामस्थांनी संपूर्ण गावाची स्वच्छता करून रांगोळ्या काढल्या . थोर पुरुषांचे फोटो घरासमोर मांडले . लेझिमच्या गजरात अनेक थोर पुरुषांचे पात्र धारण करून लेझीमच्या गजरात झाकी उत्साहात पार पडली . थोर समाजसुधारक व्यक्तींचे विचार प्रभातफेरी द्वारे ग्रामस्थांच्या मनामनात पोहचविण्यात विद्यार्थी आणि शिक्षकांना यश प्राप्त झाले.
दुपारी ठिक 3 . 00 वाजता माता – पिता पुजन कार्यक्रम पार पडला . मुलांना आईवडिलांचे महत्व , त्यांचे मुलांसाठीचे अपार कष्ट इत्यादीची जाणिव निर्माण व्हावी या उद्देशाने शिक्षकांनी मार्गदर्शन केले .
दुपारी ठिक 4 .00 वाजता आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले . विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध पदार्थ्यांच्या स्टॉलला पाहुण्यांनी , पालकांनी भेट देऊन पदार्थाची खरेदी करून आस्वाद घेतला . गावकऱ्यांनी आनंद मेळाव्यात मनमुराद आनंद घेतला . विद्यार्थ्याना स्वनिर्मिती व व्यवहाराची संधी मिळाली .
रात्री ठिक 8 .00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम ला दिपप्रज्वलनाने सुरुवात झाली . अध्यक्ष भाषणानंतर मुलांचे नृत्य सादर झाले . उपस्थित प्रेषकांनी बक्षिसांचा वर्षाव केला . मुलांच्या नृत्य कलेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला . शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली .
या सर्व कार्यकमांसाठी सर्व शिक्षक , विद्यार्थी , पालक तसेच सर्व ग्रामवासी यांनी मोलाचे योगदान दिले . तेव्हाच हा एकदिवशीय चार टप्प्यातील कार्यक्रम यशसवीरीत्या व आनंदात पार पडला . सर्वाचे शाळेच्या वतीने खूप खूप आभार !!!


Discussion about this post