
अकोट (प्रतिनिधी डॉ. संतोष गायगोले )—
संपूर्ण देशाच्या कानकोपऱ्यात कार्यरत असणारी, ग्रामिण वार्ताहरांच्या हक्कासाठी झगडणाऱ्या भारतीय ग्रामिण वार्ताहर विकास परिषद या संघटनेची अकोट तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, राज्य उपाध्यक्ष, दीपक मोहिते, राज्य सरचिटणीस असलम शेख यांच्या आदेशानवे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये अकोट तालुका अध्यक्ष पदी डॉ. संतोष गायगोले, तालुका उपाध्यक्ष पदी प्रभाकर बोरकर, दिगंबर पिंपराळे, तालुका सचिवपदी महादेव वाघ, यांच्या सह अविनाश मोरे, मो. अजहर, विनोद महल्ले यांची निवड करण्यात आली..
Discussion about this post