यावल प्रतिनिधी फिरोज तडवी
- यावल तालुक्यातील परसा डे येथील प्रभाकर शंकर पाटील शेतकऱ्याच्या गुरांच्या गोठ्याला अचानक सकाळीं भीषण आग लागली या आगीत गोठ्यात बांधलेली दोन गुरे भाजल्याने एकाचा मृत्यू झाला
आगीत गोठ्यात बांधलेली गुरे ; तसेच गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने शेतकºयाचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीची घटना वेळीच निदर्शनास आल्यावर त्यावर नियंत्रण मिळवता आले. देगाव येथील माणिकराव जगदेव शेगोकार यांचा गावामध्ये गुरांचा गोठा आहे. या गोठ्याला तसेच गोठ्यात ठेवलेले स्प्रिंकलर पाइप, गुरांचा चारा
तसेच इतर साहित्य जळून खाक झाल्याने शेगोकार यांचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. गोठ्यात लागलेली आग दिसल्याने ग्रामस्थांनी तातडीने तिथे धाव घेतली; आग विझवण्यासाठी प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. या गोठ्याच्या आजुबाजूला घरे आहेत. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने या घरांपर्यंत आग पोहोचली नाही. माहिती मिळताच सरपंच मिना तडवी यांनी घटनास्थळावर भेट देऊन नुकसानाचा पंचनामा करण्यासाठीं मंडल अधिकारी कुर्षाद तडवी यांना बोलून सदर नुकसानीचा अंदाज करत दीड लाख रुपये किंमतीची नुकसान झाले आल्याचे दिसून आले, यावेळी सरपंच मिना तडवी, उपसरपंच सुलेमान तडवी तलाठी, कुर्षाद तडवी, पोलीस पाटील व अन्य ग्रामपंचायती सदस्या उपस्तीत होतें, यांनीही प्रभाकर शंकर पाटील यांचे या आगीत मोठे नुकसान झाल्याने त्यांना शासनाने मदत देण्याची मागणी होत आहे.



Discussion about this post