
जिल्हा परिषद जालना यांच्या अंतर्गत केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, तरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढाकेफळ ता. घनसांवगी जि. जालना येथील विद्यार्थ्यांचा सहा ते आठ कबड्डी या खेळामध्ये वरिष्ठ गटातून तालुकास्तरीय मध्ये प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तर साठी निवड झाल्याबद्दल माननीय गटशिक्षणाधिकारी कार्यालय घनसावंगी येथील श्री रवींद्र जोशी साहेब,
श्री सोळुंके साहेब, श्री राखुंडे साहेब, केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गुरसाळे साहेब सरपंच सौ मंगल गाढवे, शाळेचे अध्यक्ष संतोषराव येडे,शाळेचे मुख्याध्यापक श्री गाडगे सर व सर्व शिक्षक वृंद या सर्वांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री गोरे सर, क्रीडाप्रेमी शिवराम चांदर यांनी देखील मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे..
Discussion about this post