







गुणवत्ता व नाविन्यपूर्ण उपक्रमाने नावारूपास आलेल्या जिल्हा परिषद शाळा हिवाळी नूतन इमारतीच लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी अन्न नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवाळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, त्र्यंबकेश्वर इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, शिवसेना तालुका अध्यक्ष रवींद्र भोये, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख समाधान बोडके, यांच्यासह त्रंबकेश्वर तालुक्यातील शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिवाळी येथे जाण्यापूर्वी हरसुल येथील हेलिपॅडवर हरसुल परिसरातील लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औक्षण करण्यात आले. हरसुल ठाणापाडा रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थानी पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी हरसुल परिसरातील शिवसैनिकांनी हरसुल येथे मुख्य रस्त्यावर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत केले.
हिवाळी येथे झालेल्या शालेय इमारत लोकार्पण सोहळ्याप्रसंगी यावेळी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री मा.श्री. दादाजी भुसे साहेब, महाराष्ट्र राज्य अन्न व औषध मंत्री मा.श्री. नरहरी झिरवाळ साहेब, ईगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघातील आमदार मा.श्री. हिरामण खोसकर, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, शिवसेना तालुका अध्यक्ष रविंद्र भोये, शिवसेना(उबाठा) तालुकाप्रमुख समाधान बोडके, विनायक माळेकर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दौऱ्याच्या वेळी हरसुल पोलीस स्टेशन व अतिरिक्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
हिवाळी :-येथे नूतन इमारतीचे लोकार्पण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न व नागरीg पुरवठा मंत्री नरहरी शिरवळ आमदार हिरामण खोसकर व उपस्थित मान्यवर. नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळाची पाहणी केली. दरम्यान शाळेच्या विद्यार्थ्यांनी एका हाताने इंग्लिश आणि दुस-या हाताने मराठी अशा दोन भाषांचे एकाच वेळी लेखन करून दाखवले..
सारथी महाराष्ट्राचा न्युज त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी मनोज वाजे..
Discussion about this post